मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. ‘गुरुवारी विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करा’, असे आदेश राज्यपालांनी ठाकरे (uddhav thackeray) सरकारला दिले आहेत.

त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Political) वातावरण चांगेलच तापले असून, एक झाला की एक हादरा जनतेला आणि राजकीय पक्षांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

बंडखोर आमदार गुवाहाटीला असतानाच शिवसेना (shivsena) कार्यकर्त्यांनी त्यांची कार्यालये फोडली. कुणी बंडखोर आमदारांच्या समर्थानार्थ तर कुणी विरोधात मोठी आंदोलनं केली आहे.

मात्र, या राजकीय उलथापालथ होत असताना दुसरीकडे मुंबईच्या महापौरी ‘किशोरी पेडणेकर’ (Kishori Pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून या पत्रावर संबंधित व्यक्तीचं नाव, पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे.

या पत्राची आपण गांभीर्याने दखल घेतली असून त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना ही धमकी आली आहे, “मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय. आत्ता लेखी लिहून पाठवतोय.

सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते कर. उद्धव ठाकरेंना सांग’. असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींसोबतच आता या धमकी पत्राची देखील चर्चा सुरू झाली असून, पोलीस अधिकारी या पत्राचा आणि संबंधित व्यक्तीचा तपास करत आहे.