मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, या राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेला (shivsena) वाचवण्याच्या प्रयत्नात मैदान उतरले आहे.

तर, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठा यात्रेच्या माध्यमांतून विस्कटलेल्या पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चालेल्या या संघर्षात आता उद्धव ठाकरेंचे चिरंजीव तेजस ठाकरे (tejas thackeray) यांची राजकारणात एन्ट्री होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही तेजस ठाकरे (tejas thackeray) राजकारणात येणार नसल्याची शक्यता फेटाळली नाही.

तेजस ठाकरेंना राजकारणात कधी लॉन्चिंग करायचं हे उद्धव ठाकरेच ठरवतील असं सांगून पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी तेजस यांच्या राजकीय प्रवेशाचं गूढ वाढवलं आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की..,

“तेजसची ओळख वेगळी आहे. तेजसने खेकड्यांचा शोध लावलाय. खेकड्यांना कसं वठणीवर आणायचं हे तेजसने बघितलंय. त्यांनी या खेकड्यांना वेगवेगळी नावंही दिली आहेत.

ते राजकारणात एन्ट्री करतील की नाही हे त्यांचे वडील म्हणजे उद्धव ठाकरेच सांगू शकतील. पण तेजस ओजस्वी आहे, तेजस्वी आहे.

त्यामुळे तेजस हे नाव राजकारणात कधी आलेच तर ते ओजस्वी रितीने काम करतीलच, असं किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सांगितलं.

तेजस यांची राजकारणातील एन्ट्री ग्रँड असेल असं सूचक विधानही त्यांनी केलं. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी त्यांनी सवांद साधला तेव्हा त्या बोलत होत्या.