किवळे परिसरात एकीकडे महापालिकेकडून रस्त्यांची कामे सुरू आहेत, तर दुसरीकडे वेगवेगळ्या गृह प्रकल्पांची संख्या वाढत आहे. परिणामी फ्लॅट धारकांची वाढत असलेल्या संख्येमुळे गावाला शहराचा लूक आला आहे.

मुकाई चौक नावारुपाला

किवळेगाव महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी एक खेडेगाव होते. अगदी दोन वर्षांपूर्वी अरुंद रस्त्यामुळे गृह प्रकल्पांची अत्यल्प संख्येमुळे हा भाग मागासलेपणाचा दिसत होता. किवळेत मुकाई देवीचे प्रसिद्ध आहे.

जसा रावेत, किवळे, बीआरटी झाला. त्यास जोडून किवळे ते निगडी बीआरटी झाला. यामुळे या जोड रस्त्यास मुकाई चौक हे नाव देण्यात आले. त्यामुळे या नावाने हा चौक आज नावारूपाला आलेला आहे.

Advertisement

बाजारपेठ विकसित

यासोबतच किवळेगावात सुरू झालेले सिंबॉयोसिस कॉलेज, जवळच असलेले हिंजवडी आयटीपार्क, द्रुतगती मार्गामुळे परिसरात टोलेजंग गृहप्रकल्प उभे राहिले. त्यामुळे इथे फ्लॅट घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने छोट्या-छोट्या मार्केटने बाळसे पकडण्यास मदत झाली.

होलसेल किराणा दुकानांची संख्याही भागात वाढली. पालिकेमार्फत मुकाई चौक ते किवळे आणि किवळे ते रावेत गावठाण १८ मीटर (६० फूट रुंद) डीपी रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या बाजूला स्थानिकांच्या जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत.

बहुतेकांनी रस्त्याच्या बाजूला गाळे काढून ते भाड्याने दिल्याचे रावेत किवळेदरम्यान येथील समीर लॉन्स समोर दिसत आहे. या भागात फ्लॅट धारकांची संख्या वाढली आहे.

Advertisement