ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

बोल्डर कोसळल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

रत्नागिरी : दरडी कोसळल्यानं रेल्वे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार कोकण रेल्वेला नवीन नाही. आताही राजधानी एक्सप्रेसचे चाक घसरल्याने अनेक मार्गांवर गाड्या खोळंबल्या आहेत.

इंजिन मार्गावर आणण्याचे काम युद्धपातळीवर

कोकण रेल्वे मार्गावर भोके उक्षी दरम्यान बोल्डर कोसळल्यान राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे चाक घसरून अपघात झाला आहे.

यामुळे कोकण रेल्वेची संपूर्ण वाहतूक थांबली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या अनेक स्थानकांवर थांबविल्या आहे. राजधानी एक्सप्रेसचे इंजिन मार्गावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी

कोकण रेल्वेच्या मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान बोल्डर मार्गावर पडल्याने राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे एक चाक मार्गावरून उतरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक थांबली आहे.

ही घटना आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हजरत निजामुद्दीन ते मडगाव अशी ट्रेन धावत होती. या घटनेनंतर कोकण रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी तात्काळ रवाना झाली आहे आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे.

यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे.

You might also like
2 li