उरुळी कांचन : कोरेगाव मूळमधील ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगांतर्गत पंचायत समिती हवेली यांनी सन २०२० ते २०२१ ला मंजूर झालेल्या कचरा वाहतुकोसाठी लागणाऱ्या घंटागाडीचे वाटप
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते केल्याची माहिती कोरेगाव मूळचे सरपंच विठ्ठल शितोळे यांनी दिली. ते म्हणाले, आमदार अशोक पवार यांच्या प्रेरणेतून हवेली तालुक्यातील १६ गावांना या घंटागाड्या देण्यात आल्या आहेत.
घंटागाडी पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर यांच्या निधीतून कोरेगाव मूळ ग्रामपंचायतला मिळाली आहे. या वेळी गटविकास अधिकारी प्रशांत शिके, पंचायत समिती सदस्य सनी काळभोर, अनिल टिळेकर, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर कड, सचिन निकाळजे, प्रफुल्ल पवार, नितीन कड आदी उपस्थित होते.
Advertisement