कोयता हातात घेऊन आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात, असं म्हणणा-या कोयता भाईला पोलिसांनी अटक केली. तो ज्या परिसरात दहशत पसरवित होता, तिथेच त्याची धिंड काढली.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आवळल्या मुसक्या

परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोयता भाई राकेश सरोदे उर्फ यम भाईची पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात वरातच काढली आहे.

आरोपीने ज्या भागात दहशत निर्माण केली त्याच भागात पोलिसांनी त्याची वरात काढली. या यम भाईने सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन एक इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता.

Advertisement

आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात, असं तो व्हिडीओत म्हणाला होता. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

नेमकं प्रकरण काय ?

सध्या ‘सोशल मीडिया’वर भाऊ, भाई, दादा अशा लोकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळते. अनेक जण विविध प्रकारचे व्हिडिओ हे ‘सोशल मीडिया’वर पोस्ट करत असतात, त्यापैकी काही व्हिडिओ चांगल्या संदेशाचे असतात, तर काही समाजात भीती पसरविण्याचे काम देखील करत असतात.

अशाच पद्धतीने समाजात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरातील इन्स्टाग्रामवर कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या राकेश सरोदे उर्फ यम भाई या गावगुंडाला गुंडविरोधी पथकाने अटक केली.

Advertisement

तो स्वतःला म्हणवितो कोयता भाई

तो स्वतःला कोयता भाई म्हणून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित करत होता. या कोयता भाईच्या हातात कोयता घेऊन प्रदर्शन करतानाचे व्हिडिओ ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाले.

या व्हिडिओमध्ये कोयता हातात घेऊन दहशत पसरवण्यासाठी “आमची सूत्रे येरवडा जेलमधून हलतात.” तसेच हातात कोयता घेत “वेळ आली की मी कोण आहे हे दुनियाला सांगायची आणि मी काय करू शकतो, असे म्हणून कोयता दाखवत या राकेश सरोदे ऊर्फ यम भाईने दहशत पसरवण्यासाठी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

याची गंभीर दखल घेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी या यम भाईला अटक करत त्याची मस्ती उतरवली.

Advertisement