Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

कुमारमंगलम बिर्ला यांचा चेअरमनपदाचा राजीनामा

प्रसिद्ध उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांनी व्होडाफोन-आयडियाच्या संचालक व चेअरमनपदाचा बुधवारी राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर कार्यकारी मंडळाने नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हिमांशू कपानिया यांना नान एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून नियुक्त केले आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमारमंगलम यांनी १.८ लाख कोटींच्या कर्जाखाली दबलेल्या व्होडाफोन-आयडिया कंपनीला वाचवण्यासाठी कंपनीतील आपली भागीदारी सोडण्याची तयारी सरकारकडे दर्शवली होती.

कोणत्याही सरकारी किंवा देशी वित्तीय कंपनीला आपली भागिदारी देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. कॅबिनेट सचिव राजीव गाबा यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी कंपनीवरील आपले नियंत्रण सोडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

Advertisement

दरम्यान, ब्रिटिश कंपनी व्होडाफोन ग्रुपने या कंपनीत आता कोणतीही गुंतवणूक केली जाणार नाही, असे जाहीर केले आहे.

Leave a comment