राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे विद्यार्थ्यांना मागील इयत्तेतील अभ्यासक्रमाची उजळणी होण्यासाठी सेतू अभ्यासक्रम उपक्रम राबविला जात आहे; मात्र विद्यार्थ्यांकडे गेल्या वर्षीच्या इयत्तेची पुस्तकेच नसल्याने या उपक्रमाचा गोंधळ उडाला आहे.

पुस्तके शाळा स्तरावर जमा

समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. पुस्तके जपून हाताळल्यास ती सुस्थितीत असतात. त्यांचे संकलन करून पुनर्वापर होऊ शकतो.

अन्य विद्यार्थ्यांना त्यांचे वाटप करता येते. त्यानुसार २०१९-२० किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांची पुस्तके शाळास्तरावर जमा करण्याची कार्यवाही केली.

Advertisement

सेतू अभ्यासक्रमाच्या उपक्रमाला तडा

दरम्यान, शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळांनी अनेक विद्यार्थ्यांची मागील इयत्तेची पुस्तके जमा केली. आता या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची उजळणी होण्यासाठी हीच पुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दिले.

तोपर्यंत विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके शाळेत जमा केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे पुस्तकेच नाही. अनेक विद्यार्थ्यांनी शाळांकडे जुन्या इयत्तेची पुस्तके जमा केली आहेत, त्यामुळे ५० टक्के विद्यार्थ्यांकडे पस्तके नाहीत.

सरकारी शाळांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक पुस्तके जमा केली आहेत. या दोन्ही परस्पर विरोधी निर्णयामुळे शिक्षक-मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यातच नवी पुस्तके अद्याप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नसल्याने सेतू अभ्यासक्रमाच्या उपक्रमाला तडा बसत आहे.

Advertisement