मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. २७ दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू आहेत. लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना पुन्हा एक त्यांची तब्येत खालावली आहे.

डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. लता दीदींना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर (Ventilator) ठेवण्यात आले आहे.

Advertisement

लता दीदी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. लता दीदींना कोरोनाची (Corona) लागण झाली होती.

कोरोनाची लग्न झाल्यांनतर लता मंगेशकर यांना न्यूमोनियाचीही (Neumonia) लागण झाली आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर लतादिदींना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते.

त्यांच्या प्रकृती सुधारणा आल्याची डॉक्टरांनी माहिती दिली होती. पण पुन्हा एकदा लता मंगेशकर यांना श्वास घेण्यास त्रास होईल लागल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

Advertisement