मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची तब्येत (Health) बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. २७ दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत.

डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. लता दीदींना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर (Ventilator) ठेवण्यात आले आहे.

लता दीदी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार करण्यात येत आहेत. लता दीदींना कोरोनाची (Corona) लागण झाली होती.

Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. लता मंगेशाकार यांच्या भेटीसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) रुग्णालयात दाखल झाले आहेत. लता दीदींच्या प्रकृतीबाबत त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला आहे.

आज सकाळी पुन्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

Advertisement