पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला (सारथी), स्वायत्तता देण्यात आली असून १३ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सारथी संस्थेची ८ विभागीय कार्यालये होणार आहेत. पहिले कार्यालय कोल्हापूरला सुरू होणार आहे.

एक हजार कोटींसाठी मागितला वेळ
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार संभाजीराजे यांच्यात झालेल्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. या वेळी संभाजीरांना सारथी संस्थेसाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी केली.

ही मागणी तसंच अन्य काही मागण्यांसाठी २१ दिवसांचा वेळ लागणार आहे, असं संभाजीराजांनी सांगितले असून, चर्चा सकारात्मक झाल्याचे ते म्हणाले.

Advertisement

समाजासाठी सारथी हवं आहे

सारथीच्या माध्यमातून वसतिगृहे
समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना सारथीवर घेतो, असे आश्वासन पवार यांनी या वेळी दिले. संभाजीराजेंना सारथीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. ही संस्था समाजासाठी मजबूत व्हायला हवी आहे,

असे संभाजीराजे म्हणाले. सारथीच्या माध्यमातून वसतिगृह सुरू होणार आहेत. नऊ-दहा वसतिगृहे होणार सुरू करण्याबाबत युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.

Advertisement

तारादूत प्रकल्पाचं काय?
तारदूत प्रकल्प सुरू होणार आहे, त्याबाबत काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर होतील, असे सांगण्यात आले असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.

 

Advertisement