Lava Blaze 5G : 6GB RAM सह लावाचा हा 5G स्मार्टफोन झाला लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी क्लिक करा येथे…

0
66

Lava Blaze 5G : जर तुम्हीही कमी बजेट मध्ये 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लावाने आपल्या ग्राहकांसाठी Lava Blaze 5G चा नवीन व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 6 GB रॅम सह सादर करण्यात आला असून, त्याची किंमत फक्त 11,499 रुपये आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनची अधिक माहिती पुढीलप्रमाणे..

लावा ब्लेझ 5G आधीच भारतात लॉन्च झाला आहे. पण नंतर त्याचा 4 जीबी रॅम व्हेरिएंट लॉन्च करण्यात आला. आता कंपनीने एक पाऊल पुढे टाकत आपल्या स्वस्त 5G स्मार्टफोनचा आणखी एक प्रकार बाजारात लाँच केला आहे. Lava Blaze 5G चे 6 GB रॅम व्हेरिएंट सादर करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी हा एक स्वस्त पर्याय ठरू शकतो कारण त्याची किंमतही कमी आहे.

लावा ब्लेझ 5G किंमत –

या फोनच्या 6 GB रॅम वेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. यापूर्वी, कंपनीने 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट लॉन्च केले होते, ज्याची किंमत 9,999 रुपये होती. हा स्मार्टफोन आपण ग्लास ग्रीन आणि ग्लास ब्लू रंगांमध्ये खरेदी करू शकतो. तसेच हा स्मार्टफोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

लावा ब्लेझ 5G ची वैशिष्ट्ये –

या फोनमध्ये 6.5-इंचाचा IPS डिस्प्ले दिला आहे. तसेच हा स्मार्टफोन फ्लॅट एज डिझाइनसह येतो. यामध्ये वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच देण्यात आली आहे. त्याचा रीफ्रेश दर 90 Hz आहे. तसेच फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असून, हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर सह येतो. या स्मार्टफोन मध्ये 6 GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. तसेच 128 GB स्टोरेज देण्यात आले आहे. हे मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते.

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा आहे. त्याच वेळी, 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे. तसेच Android 12 देण्यात आला आहे.

लावा ब्लेझ 5G स्पेसिफिकेशन्स –

– परफॉर्मन्स मीडियाटेक डायमेन्सिटी 700 MT6833
– डिस्प्ले 6.5 इंच (16.51 सेमी)
– स्टोरेज 128GB
– कॅमेरा 50 MP AI ट्रिपल कॅमेरा
– बॅटरी 5000mAh
– भारतात सुरुवातीची किंमत 9999
– रॅम 4 जीबी ते 6 जीबी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here