डिंभे कालव्यांना गळती लागली असून त्याचे पाणी शेतीत घुसून शेतक-यांचं नुकसान होत आहे. कुकडी पाटबंधारे विभागानं ही गळती थांबविण्याची मागणी होत आहे.

अस्तरीकरण खचल्याने गळती

जुन्नर, आंबेगाव तालुक्याला जोडणारा डिंभे डावा कालवा ५५ किलोमीटरवर लांबीचा आहे. आवर्तन कालावधीत डिंभे धरणातील पाणी येडगाव धरणात सोडण्यासाठी प्रामुख्याने या कालव्याचा वापर केला जातो.

कालव्याची वहन क्षमता १२४४ क्यूसेक्स आहे; मात्र सिमेंटचे अस्तरीकरण खचल्याने कालव्याची दुरवस्था झाली आहे.

Advertisement

मागील दहा वर्षात हा कालवा अनेक वेळा फुटला असून कालव्यावरील पूल व पुलावरील अतिवाहकाच्या भिंती जीर्ण झाल्याने धोकादायक झाल्या आहेत.

या मुळे कालव्याची वहन क्षमता कमी झाली असून कालव्यात ५०० क्यूसेक्स पेक्षा जास्त पाणी सोडता येत नसल्याने अवर्तन पूर्ण होण्यास अडचण येत आहे.

पिकांचे नुकसान

वहन क्षमता कमी झाल्याने अवर्तन पूर्ण करण्यासाठी कालव्यात सहा महिने पाण्याचा प्रवाह राहतो.

Advertisement

या मुळे कालव्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाण्याचा अपव्यय होत असून कालव्या लगतच्या उभ्या पिकात पाणी साठत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.