भारतातील सर्वत्र आढळणा-या वृक्षांपैकी एक महत्त्वाचा वृक्ष म्हणजे वड. या वृक्षाशी निगडीत असलेला हा सण आहे.

या सणामागची पौराणिक कथा अशी की सावित्री या पुण्यवान व पतिपरायण स्त्रीने आपल्या पतीचे – सत्यवानाचे प्राण परत मिळवण्याकरिता, प्राण घेऊन जाणा-या यमराजाला आपल्या भक्तीने व युक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले.

ज्या वृक्षाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजसुध्दा बायका वडाची पूजा करतात.

Advertisement

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. पंचांगानुसार उद्या वटपौर्णिमा आहे. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे.

वटपौर्णिमेचे व्रत सुरू होण्यामागील पूर्वपीठिका :यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली;

म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली.

Advertisement

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व :वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी,

यासाठी ईश्‍वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्‍ती व शिव यांच्या संयुक्‍त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.

Advertisement