Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

भगवान विष्णूची पूजा सफल करण्यासाठी कोणती फुले वाहावी आणि कोणती नाही जाणून घ्या

विष्णू धर्मोत्तर पुराण आणि पद्म पुराणात असे म्हटले आहे की पुरुषोत्तम महिन्यात भगवान विष्णूची स्वर्ण पुष्पाने पूजा करण्याचा नियम आहे.

या महिन्यात भगवान विष्णूला चंपाचे फूल अर्पण केल्यास सर्व प्रकारची पापे दूर होतात व मनोकामना पूर्ण होतात.

काशीचे ज्योतिषाचार्य आणि धार्मिक शास्त्रांचे अभ्यासक पंडित गणेश मिश्रा यांचे म्हणणे आहे की अश्विन महिन्यात जुही आणि चमेलीच्या फुलांनी भगवान विष्णूची पूजा केल्यास भरभराट होते. याबरोबरच तुळशीची पाने ही देवाला अर्पण करावीत. याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात.

Advertisement

आवडते फूल

भगवान विष्णूच्या पूजेमध्ये मालती, केवडा, चंपा, कमळ, गुलाब, मोगरा, कनेर आणि झेंडूचा वापर करावा. यामुळे श्रीहरी प्रसन्न होतात.

या बरोबरच जती, पुन्नाग, कुंड, तगर आणि अशोकाच्या झाडाची फुलेही देवाला प्रिय असलेल्या फुलांमध्ये येतात. या फुलांसह भगवान विष्णूची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.

आवडती पाने

भगवान विष्णूच्या पूजेमध्ये फुलांसह पानेदेखील वाहिली जातात. भगवान विष्णूची आवडती पाने म्हणजे तुळशी, शमी पत्र, बिल्वपत्र आणि दुर्वा.

Advertisement

यासह, भृंगराज, खेर, कुशा, दमणक म्हणजेच दवाना आणि आपमार्गा म्हणजेच चिराचिताची पाने विष्णूच्या पूजेमध्ये वापरली जातात.

भगवान विष्णूच्या उपासनेत कशाचा वापर करू नये ?

भगवान विष्णूच्या पूजेमध्ये अगस्त्य फूल, माधवी आणि लोधी फुले वापरली जात नाहीत. यासह विष्णूच्या मूर्तीवर तांदूळही चढवले जात नाही. अधिक महिन्यात देवाची उपासना करताना या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

फुला पानांबद्दल लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

देवाच्या उपासनेत अशुद्ध, शिळे आणि कीटकांनी खाल्लेले, फुले व पाने वापरू नयेत. जमिनीवर पडलेली, इतरांकडून आणलेली किंवा चोरी केलेली फुलेदेखील उपासनेत वापरू नये.

Advertisement

त्याशिवाय पाच दिवस जुने कमळ व कुमुद फुले वापरू नये. तसेच बिल्वपत्र आणि तुळस यांची तुटलेली जुनी पाने देखील अर्पण करू नयेत.

 

Advertisement
Leave a comment