पुणे : जिल्ह्यामध्ये बिबट्याचा (Leopard) वावर हा अधिक असल्याचे बऱ्याच वेळा दिसून आले आहे. बिबट्या (Leopard attack) कधी जनावरांवर तर कधी माणसांवर हल्ला करत असतो.

पण बिबट्याने आता चक्क धावत्या गाडीवरचा हल्ला केला आहे. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यात घडली आहे.

एका दाम्पत्याला (Marital) गाडीवरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आहे. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहे.

Advertisement

दत्तात्रय शिंदे (Dattatraya Shinde) यांनी बिबट्याने हल्ला केल्यानंतर प्रसंगावधान दाखवत गाडी न थांबवता जोराने पुढे घेऊन गेले.

गाडीवर मागे बसलेल्या हौसाबाई शिंदे (Hausabai Shinde) यांच्या पायाला बिबट्याचा पंजा लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

हे शिंदे दांपत्य जुन्नर जवळील बोरी बुद्रुक येथील सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ गाडीवरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

Advertisement

बिबट्याच्या वारंवार हल्ल्यामुळे जुन्नर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.