जुन्नर – जुन्नर (junnar) तालुक्‍याचा अस्मितेचा विषय असलेला बिबट सफारी (leopard safari) बारामतीला नको; तर जुन्नरलाच झाली पाहिजे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्‍यातील जनतेकडून होत आहे. यावरून सतत राजकारण झाल्याचे देखील पण पाहिले आहे. मात्र, आता याच बिबट सफारी (leopard safari) संदर्भातील एक माहिती समोर आली आहे. सध्या ओतूर आणि परिसरात बिबट्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास काळोखात बिबटयांचा (leopard safari) खुले आम वावर दिसून येत असल्याने बिबटे ओतूर परिसरातील वाड्या वस्त्यांना जाणार्‍या रस्त्यांवर रात्रीच्या अंधारात बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत.

हे ओतूरमधील काही युवकांच्या लक्षात आल्यामुळे रात्री ११ वाजेनंतर बहुतांश युवक बिबट्याच्या (leopard safari) हालचाली मोबाईलद्वारे व्हिडिओतून टिपण्यासाठी व

बिबट्याला पहाण्यासाठी बंदिस्त चारचाकी गाडीतून गटा गटाने राणावनाकडे जाणार्‍या रस्त्याने प्रवास करून बिबट्याचे (leopard safari) दर्शन घेत आहेत. सध्या याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत बिबट सफारी (leopard safari) प्रकल्प आंबेगव्हान येथेच होणार असल्याचे जाहीर केले आहे.

मात्र, त्याआधी बिबट सफारी (leopard safari) हा प्रकल्प तालुक्‍याच्या पूर्व भागातील असलेल्या उंचखडक या गावात व्हावा, या मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने

खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नर तालुक्‍याचे आमदार अतुल बेनके, उपवनसंरक्षक अधिकारी अमोल सातपुते यांना देण्यात आले होते.

बिबट सफारीकरिता लागणारे नैसर्गिक आणि भौगोलिक वातारण या ठिकाणी असून, हा प्रकल्प उंचखडक गावात व्हावा असं या निवेदनातून सांगण्यात आलं आहे.

जर हा प्रकल्प याठिकाणी झाला तर, जंगलात जाण्यासाठी रस्ते चांगले आहते. तसचे बिबट्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी धरण सुद्धा आहे. आणि वातारण देखील अनुकूल आहे. असं यावेळी सांगण्यात आलं होत.