भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यव्यापी दाैरे करायला लागल्या असून आता त्यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दांत प्रहार केले आहेत.

सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात 26 जूनच्या आंदोलनसाठी आम्ही तयार झालो आहोत, असा इशारा मुंडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्य सरकारचा वेळकाढूपणा

मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षण निर्णयाबाबत पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर उपस्थित होते.

Advertisement

राज्य सरकारने वेळेत कागदपत्र सादर न केल्यामुळे हे आरक्षण धोक्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ओबीसी विषयावर चर्चा आणि भूमिका ठरवली होती. वेळ देऊनही सरकारकडून वेळकाढूपणा केला जातो, असा आरोप त्यांनी केला.

ओबीसीला आरक्षण मिळवून देऊच

मराठा समाजाला आरक्षण देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले; मात्र ओबीसीला तर आता आम्ही मिळवून देऊच, अशी भूमिका घेत आरक्षण रक्षणार्थ रस्त्यावर उतरणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

निवडणुका होऊ देणार नाही

ग्रामविकास मंत्री असताना हा विषय मीच हाताळत होते. 50 टक्के आरक्षण आहे. इमपीरिकल डाटा द्यायला वेळ मागितली होती. डाटा न्यायालयासमोर सादर केला नाही.

Advertisement

लवकरात लवकर याचिका करून इमपीरिकल डाटा सादर करावा, जिल्हानिहाय टास्क फोर्स करून डाटा गोळा करा, अन्यथा निवडणुका होऊ देणार नाही, ही ठाम भूमिका असल्याचे त्या म्हणाल्या.

केंद्राकडे बोट दाखविणे चूक

राज्य सरकारने केंद्रकडे बोट दाखविणे चूक आहे. त्याचा जनागणानेशी काहीही संबंध नाही. इमपीरिकल डाटाच्या आधारावर रिपोर्ट सादर करावा असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. जनगणना हा शब्द नाही. हा डाटा राज्य सरकारचा मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मिळवू शकतो, असे पंकजा म्हणाल्या.

 

Advertisement