भाजपच्या ‘या ‘नेत्याच्या डोळ्यांत आसू

मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी असते. कितीही नाही म्हणाले. तरी दुः ख वाटणे स्वाभावीक आहे. ते लपविता येत नाही.

पंकजा मुंडे यांच्याबाबतीतही तसंच झालं. पत्रकार परिषदेत नाराज नाही, असं सांगतानाही पंकजा यांचे डोळे पाणावले.

मुंडे भगिनींच्या नाराजीची चर्चा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघी भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरू होती.

यावर भाजपनं, मुंडे भगिनी नाराज नाहीत, असं स्पष्ट केलं; मात्र आज खुद्द पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिलं. या वेळी बोलता बोलता त्यांचे डोळे पाणावल्याचे दिसून आले.

अन् पंकजा यांचे डोळे पाणावले…

पत्रकारांनी ज्यावेळी विचारलं, की प्रितम मुंडे यांना संधी मिळायली हवी होती असं तुम्हाला वाटतं का? त्या वेळी पंकजा म्हणाल्या, “पक्षासाठी पायाला फोड येईपर्यंत आम्ही काम केले आहे.

प्रीतम मुंडे या राजकारणात लोकांमधील नकारात्मक विचार शांत करण्यासाठी आल्या. प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांनी पदासाठी कोणाकडे मागणी केली नाही. महाराष्ट्रातील नावे आली की प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांची नावे येतात.

प्रीतम मुंडे यांना साहेबांच्या मृत्यूनंतर राजकारणात यावं लागलं. पहिली टर्म त्यांना साहेबांच्या कामांमुळे लोकांनी निवडून दिलं; पण दुसऱ्या टर्ममध्ये त्या स्वत: केलेल्या कामांमुळे निवडून आल्या.”

‘पायाला फोड आलेले असतानाही मी त्यांचा पक्षासाठी प्रचार केला’, हे वाक्य उच्चारत असतानाच पंकजा यांचा आवाज गहिवरला, डोळे पाणावले अन् त्या क्षणभरासाठी थांबल्या.

ओबीसीसाठी संघर्ष करीत राहणार

त्यांना पत्रकारांनी विचारताच… ‘साहेबांची (गोपीनाथ मुंडेंची आठवण आल्याने असं झालं’, असं त्या म्हणाल्या आणि पुढे प्रश्नांची उत्तर द्यायला त्यांनी सुरुवात केली. महाराष्ट्राचा नेता असतो, जातीचा नेता नसतो.

वंचित असेल त्यांच्यासाठी मी आवाज उठवेन. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही, यावर कायम आहे. ओबीसी आरक्षण मिळून देण्यासाठी केंद्राचे चार नेते तयार झाले आहेत.

खडसे यांच्याबद्दल बोलणं चुकीचं

ईडी, सीबीआय या मोठ्या यंत्रणा आहेत. त्यात चौकशी झाली तर योग्य न्याय होईल. खडसे यांच्या चौकशीविषयी मी मीडियामध्ये बोलणे चुकीचे आहे. नियमानुसार जे असेल ते होईल.