पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजतोडणीवरून (Power outage) चांगलेच राजकारण (Politics) तापले आहे. आता अशातच काही शेतकऱ्यांसाठी (Farmer) दिलासादायक बातमी येत आहे.

राज्यामध्ये वीज तोडणीवरून विरोधक (Opponent) आणि शेतकरी संघटना (Farmers Association) चांगल्याच आक्रमक झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.

एकीकडे महावितरणकडून (MSEDCL) वीज तोडणी सुरु आहे. दुसरीकडे ऊर्जामंत्री (Minister of Energy) नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याकडून कोणालाही वीज फुकट मिळणार नाही असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

अशातच कृषिमंत्री (Minister of Agriculture) दादा भुसे (Dada Bhuse) यांनी ऊर्जामंत्र्यांना आव्हान केले आहे. ज्या शेतकऱ्यांची वीज बिल भरण्याची परिस्थिती नाही. त्यांची वीज तोडणी थांबवा.

ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांनी चालू बिल भरावे. आम्ही ऊर्जा विभागाला विनंती करतो की शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात येऊ नये.

ऊर्जा विभाग सांगत आहे की 60 हजार कोटी वीज बिल थकित आहे. त्यामुळे ऊर्जा विभाग (Department of Energy) अडचणीत येऊ शकतो. ही वस्तूस्थिती असली तरी शेतकऱ्यांची वीज तोडू नका, असे आवाहन दादा भुसे यांनी केले आहे.

Advertisement