file photo

वानवडी परिसरात लेफ्टनंट कर्नल पदावर असलेल्या महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे.

रश्मी आशुतोष मिश्रा (४३) असे मृत महिलेचे नाव आहे.
कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

रश्मी मूळ डेहराडूनच्या रहिवासी असून त्या जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्समध्ये पोस्टिंगला होत्या.

Advertisement

पुण्यात आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्यांचे ट्रेनिंग घेण्यासाठी त्या आल्या होत्या. तीन महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले होते.

त्यांचे पतीदेखील लष्करात कर्नल पदावर कार्यरत आहेत.

बुधवारी सकाळी मिश्रा यांच्या घरी कामगार आला असता घराचा दरवाजा बराच वेळ न उघडल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले.

Advertisement

त्यानंतर दरवाजा उघडला असता मिश्रा या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या.

वानवडी पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी ससून रुग्णालयात पाठवला.

Advertisement