ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

वीज पडली, झरे वाहते झाले!

वीज पडली, तर अनेकांचा जीव घेऊन जाते; परंतु प्रत्येक वेळी असं घडतंच असं नाही. नैसर्गिक आपत्ती प्रत्येक वेळी नुकसान नाही करीत, तर ती चमत्कार करते आणि हा चमत्कार लोकांच्या फायद्याचा ठरतो.

ग्रामीण भागात तर श्रद्धा आहे, वीज जिथं पडते, तिथं पाणी घेऊन ती बाहेर पडते. बारामती तालुक्यातही हा अनुभव आला.

खडकाळ भाग जलमय

कधी कधी आपत्ती आशेचा किरण दाखवणारी ठरते. याचा अनुभव बारामती तालुक्यातील कारखेल गावाला आला आहे.

गावच्या माळरानावर वीज कोसळली आणि तिथेच पाण्याचे झरे वाहू लागले. खडकाळ भाग काही वेळातच जलमय झाला. ही घटना गावकऱ्यांना सुखद धक्का देणारी ठरली.

जिरायती गाव पाणीदार होणार

बारामती तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागते. येथील सरासरी पर्जन्यमान ४२४.९ मिलीमीटरच्या दरम्यान असते.

बारामती तालुक्यातील २२ गावे जिरायती पट्ट्यामध्ये मोडतात. यामध्ये कारखेल या गावाचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून कारखेल परिसरात तुरळक पाऊस सुरू होता.

त्यात अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. दरम्यान, ग्रामदैवत कोरेश्वर मंदिराच्या परिसरात वीज कोसळली.

माळरानावर ज्या ठिकाणी ही वीज कोसळली त्याठिकाणि जमिनीतून पाण्याचे झरे वाहू लागले आहेत.

गंगा अवतरली

गावातील मेंढपाळ आणि शेतकऱ्यांना माळरानावर अचानक जमिनीतून पाणी वाहताना दिसले आणि सगळेच अवाक् झाले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा तयार झाला आहे. ही घटना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

याबाबत राजहंस भापकर या गावकऱ्याने प्रतिक्रिया दिली. आमच्या गावात कायमच पाण्याचे दुर्भिक्ष असते.

उन्हाळ्यामध्ये जनावरांसह माणसांचेदेखील पाण्यामुळे हाल होतात. वीज पडल्याने आमच्या दुष्काळी गावात गंगा अवतरली आहे, असे भापकर म्हणाले.

 

You might also like
2 li