मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेनंतर भाजपचे (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड उठली आहे.

संजय राऊत यांनी मुंबईचा (Mumbai) दादा शिवसेनाच आहे, आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणंही त्यांना मुश्किल होईल असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला होता.

संजय राऊतांच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, शेर कभी गिदड धमकी से डरा नही करते. राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड (Victim card) खेळत आहेत.

Advertisement

रोज सकाळी येऊन ते मनोरंजन करत असतात. संपादक असल्याने चर्चेत राहण्यासाठी काय विधाने केली पाहिजे हे त्यांना माहीत आहे, असे सांगतानाच राऊत यांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन म्हणणे मांडावे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, ईडी काय करते हे ईडी सांगेल. ते का करतात तेही ईडी सांगेल. संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे जे वक्तव्य आहे तो व्हिक्टिम कार्डचा एक भाग आहे. त्यांचं काही म्हणणे असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन मांडावे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Advertisement

देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीशी (NCP) युती करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. फडणवीस म्हणाले, कोणतेही नवीन समीकरण नाही.

भाजप महाराष्ट्रात (Maharashtra) विरोधी पक्षात राहूनच काम करेल. पूर्ण शक्तीने आमच्या मेजोरिटीने आम्ही राज्यात सरकार स्थापन करू असेही फडणवीस म्हणाले.

Advertisement