पुणे Live24 टीम , 4 मे 2020 :- पुणे जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने सुरु करण्यासंदर्भात आता प्रशासनाचा निर्णय झाला आहे.
जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकानं सुरु करण्यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शासन आदेश काढला आहे.
यात मद्यविक्री आणि निर्मितीसाठी लागू करण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचीही माहिती देण्यात आली आहे.
- पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील औद्योगिक वसाहती आणि टाऊनशिपमधील मद्य निर्मिती सुरु होईल
- मद्य निर्मितीच्या ठिकाणी कामगारांची थर्मल स्किनिंग आवश्यक
- ज्या कामगारांना सर्दी, खोकला आणि ताप यासारखे लक्षणे आहेत त्यांना प्रवेश देऊ नये
- मद्य निर्मिती करताना फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम कसोशीने पाळावेत
- मद्य विक्री करताना एकावेळी दुकानासमोर 5 पेक्षा अधिक लोक असू नयेत
- फिजीकल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक
- दारू खरेदी करणार्या ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करावेत
- सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश नाही
पुणे शहरासह जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या व कोरोना व्हायरस अपडेट्स साठी आजच पुणे Live चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/Punelive24page
PuneLive24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा punelive24@gmail.com वर
This Story First Publish on punelive24.com®