पुणे – मामा आपल्या भाचीना दुचाकीवर शाळेत सोडायला जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक (accident) दिल्याची घटना लोणी काळभोर (lonikalbhor) येथे घडली आहे. या अपघातात (accident) दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 20) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेसात वाजता पांडुरंग नवनाथ भिक्षे (वय 42 , रा. काळभोर नगर, कवडीपाट, ता. हवेली) हे कवडीपाट येथून त्यांच्या

भाची गायत्री नंदकुमार शितोळे (वय 17 ) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय 10) यांना कन्या शाळा लोणी काळभोर मध्ये सोडण्याकरीता जात होते.

दरम्यान साडेसात वाजता लोणी (lonikalbhor) स्टेशन चौक याठिकाणी एका भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली . या अपघातात दुचाकीवरील मामा आणि मुली वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्या गेल्या,

यावेळी कंटेनर मुलींच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात (accident) मात्र त्यांचा मामा हा बचावला असून त्याला कुठली दुखापत झाली नाही.

अपघातनंतर कंटेनरचालक कंटेनरसह पळून गेला होता मात्र कंटेनर पकडण्यात लोणीकाळभोर पोलिसांना यश आले आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, महामार्गाशेजारीच हाकेच्या अंतरावर नामंकित हॉस्पिटल व लोणी काळभोर (lonikalbhor) पोलीस ठाणे आहे. तरीही ना वाहतूक शाखेचे पोलीस, ना शेजारी असलेले डॉक्टर, व ॲम्बुलन्स आली नसल्याने

तब्बल अर्धा ते पाऊन तास या मुलींना मदत मिळाली नाही. त्यामुळे अपघात झालेल्या ठिकाणी दोन्ही मुली तशाच पडून होत्या.

त्यामुळे मदत मिळाली नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.