Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

परमबीर सिंह यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे परमबीर यांना आता परदेशात जाता येणार नाही.

कारवाईचा फास चालला आवळत

परमबीर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. परमबीर यांच्यावर दिवसेंदिवस कारवाईचा फास आवळत चालला आहे.

त्यांच्या विरोधात आतापर्यंत ठाणे आणि मुंबई परिसरामध्ये चार गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. त्या बरोबरच त्यांच्यावर होणा-या आरोप-प्रत्यारोपामुळे प्रकरण वाढत चालले आहे.

Advertisement

विमानतळाला केले ज्ञात

दरम्यान, परमबीर मुंबईत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात “लुक आऊट” नोटीस जारी केली असून त्याची माहिती विमानतळ आदी ठिकाणी देण्यात आल्याचे सूत्रांची माहिती आहे.

परमबीर सिंग यांनी देश सोडून बाहेर जाऊ नये, परदेशात जाऊ नये यासाठी ही “लुक आऊट” नोटीस जारी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दिलाशाची मुदत संपल्याने अटकेची शक्यता

सिंह यांना न्यायालयाने 28 जुलैपर्यंत दिलासा दिला होता. या दिलाशाची मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येलाच मुंबई पोलिसांनी परमबीर यांच्याविरोधात “लूक आऊट” नोटीस जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची किंवा त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement

निकटवर्तीयांच्या बदल्या

मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेल्या सिंह यांच्या निकटवर्तीयांची बदली करण्यात आली आहे.

पोलिस उपायुक्त गुन्हे अकबर पठाण यांची बदली सशस्त्र विभाग नायगाव येथे करण्यात आली असून सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांची बदली करण्यात आली आहे.

 

Advertisement
Leave a comment