Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मद्यधुंद तरुणीचे भररस्त्यातच लोटांगण,पुण्यातील घटना, पोलिस येईपर्यंत तरुणी पळाली!

एका २६ वर्षीय तरुणीने पुण्यातील टिळक रस्ता येथे मंगळवारी रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन भररस्त्यातच झाेपून धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला.

पाेलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत तरुणी पळून गेली. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ साेशल मीडियात माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेऊन खमंग चर्चा रंगली.

अलका टाॅकीजकडून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या टिळक रस्त्यावर दिवसा अाणि रात्रीही वाहनांची गर्दी असते. मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक अनाेळखी तरुणी टिळक रस्त्यावर अाली.

Advertisement

दारूच्या नशेत असलेली तरुणी बडबड करत रस्त्याच्या मध्यभागी येऊन रस्त्यावरच लाेळू लागली अाणि वाहने अडवू लागली.

तसेच रस्त्यात बसून तिने चित्रविचित्र हावभाव करत लाेटांगण घातल्याने रस्त्यावरून जाणारे नागरिक व वाहनचालक अचंबित हाेऊन तिच्याकडे पाहत हाेते.

स्वारगेट पाेलिस घटनास्थळी काही वेळात दाखल झाले. परंतु त्यापूर्वीच तरुणी निघून गेली हाेती. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाेलिस तिचा शाेध घेत आहेत.

Advertisement
Leave a comment