कामगाराचा मालकाच्या मुलीवर जीव जडला. मुलीसह तो पळून गेला. या घटनेनं संतप्त झालेल्या मालकानं मग संतापाच्या भरात मुलीचा प्रियकर व त्याच्या मित्राचा बळी घेतला. चाकणमधील करंजविहिरे गावात ही घटना घडली.

दुहेरी हत्याकांडानं चाकण हादरलं

चाकणमधील करंजविहिरे गावात दुहेरी हत्याकांड झाले. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रियकर आणि त्याच्या मित्राला लाकडी दांडके, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. यातच दोघांचा मृत्यू झाला. या मारहाणीत प्रेयसी जखमी आहे.

Advertisement

मुलीच्या वडीलांसह सहा जणांवर गुन्हा

या प्रकरणी मुलीच्या वडीलांसह एकूण सहा जणांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाळू सीताराम गावडे आणि त्याचा मित्र राहुल गावडे हे दोघे वीटभट्टीवर कामाला होते.

बाळू आणि वीटभट्टी मालकाची मुलगी 14 तारखेला पळून गेले होते. यासाठी राहुलने मदत केली होती.

यावरून मुलीच्या वडीलांनी बाळू आणि राहुल या दोघांना त्यांच्या हॉटेलवर आणून बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

नेमकं प्रकरण काय ?

बाळू गावडे (26) आणि राहुल गावडे (28) हे दोघे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आसखेड गावचे रहिवासी होते. दोघेही चाकणजवळच्या करंजविहिरे गावात एका वीटभट्टीवर कामाला होते.

या वीटभट्टी मालकाचं हॉटेलही आहे. या वीटभट्टी मालकाला 21 वर्षांची मुलगी आहे. बाळू आणि या मुलीचं प्रेमप्रकरण जुळलं होतं.

या प्रेमप्रकरणाला साहजिकच मुलीच्या घरातून विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.

Advertisement