महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी महागाईचा शॉकदिला आहे. कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत 43.5 रुपयांनी वाढविली आहे.

यामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे आदी ठिकाणी अन्न महाग होऊ शकते आता दिल्लीत 19 किलोचे कमर्शियल सिलेंडर 1736.5 रुपयांना झाले आहे. पूर्वी ते 1693 रुपयांना होते. मात्र, घरगुती वापरासाठी 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत न बदलल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोलकात्यात 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत 1805.5 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी ही किंमत 1770.5 रुपये एवढी होती. महत्वाचे म्हणजे, पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेत असतात.

Advertisement

1 सप्टेंबरला घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत वाढवून 884.50 रुपये करण्यात आली. या महिन्यात या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

यावर्षी घरगुती गॅस सिलेंडर 190 रुपयांनी महागला

एक जानेवारीपासून आतापर्यंत आठ महिन्यांमध्ये सिलेंडच्या किमतींमध्ये 190 रुपयांची वाढ झाली आहे. एक जानेवारी रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. आता दर वाढून 884.5 रुपयांवर पोहोचले आहेत.

Advertisement

2021 मध्ये फेब्रुवारी महिन्यात सिलेंडरचे दर वाढून 719 रुपये इतकी झाली आहे. त्यानंतर सिलेंडच्या किमती 15 फेब्रुवारी रोजी 769 रुपये, 25 फेब्रुवारी रोजी 794 रुपये, 1 मार्च रोजी 819 रुपये, 1 एप्रिल रोजी 809 रुपये, 1 जुलै रोजी 834.5 रुपये, 18 ऑगस्ट रोजी 859.5 रुपये इतक्या होत्या.

दरम्यान, तेल कंपन्यांनी दर महिन्याला एलपीजी सिलेंडरच्या किमतींची समिक्षा करतात. त्यानंतर किमती वाढवणं किंवा किंमतींमध्ये घट करणं यासंदर्भात निर्णय घेण्यात येतो. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असतो.

याच कारणामुळे गॅसच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळतो. सध्या केंद्र सरकार एका वर्षात ग्राहकांना 12 घरगुती गॅस सिलेंडरवर अनुदान देतं. जर एखादा ग्राहक याहून अधिक वापर करत असेल तर त्याला बाजारभावाने खरेदी करावी लागते.

Advertisement