पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कर्जत जामखेडचे (Karjat-Jamkhed) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाजपवर (BJP) कडाडून निशाणा साधला आहे. भाजप पेपरफुटीवरून (Exam Scam) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पेपरफुटी प्रकरणानंतर भाजपने सीबीआयकडून (CBI) चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
रजपूत, दाभोलकर केस सीबीआयकडेच आहेत, त्याचे काय झाले ? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकार खोलात जाऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले आहे.
महापोर्टल (Mahaportal) भाजपच्या काळात झालेय, तो घोटाळा उघडकीस आहेच. हे सगळे धागेदोरे भाजपच्या मोठ्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भीतीपोटी हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करत आहेत. जेणेकरुन केंद्राचा कंट्रोल यावर राहील. अशी टीका पवार यांनी केली.
यावेळी बोलताना त्यांनी आमदार गोपीचंद पाडळकरांवरही (Gopichand Padalkar) टीका केली आहे. पाडळकरांवर झालेल्या हल्याचा निषेध पवार यांनी केला.
पडळकरांवर लोकांचा एवढा रोष का आहे ? हे लक्षात घ्यायला पाहिजे असा खोचक प्रश्न उपस्थित करत रोहित पवारांनी पाडळकरांवर टीका केली आहे.
पडळकरांवर झालेला हा हल्ला व्यक्तिगत चुकिचा वाटतो. परंतु, घटना घडून एवढे दिवस झाल्यानंतर आज या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत.
राजकीय भांडवल करण्यासाठी एवढ्या दिवसांनी हे व्हिडिओ व्हायरल (Video viral) होत असतील तर ते चुकीचे आहे. कुठल्याही आमदाराला सुरक्षा मिळते.
त्यांनी घेतली नाही हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. एकत्रित बसून ही परिस्थिती का आली याचा विचार व्हायला हवा, असे म्हणत रोहित पवारांनी पाडळकरांचा चांगलाच समाचार घेतला.