पुणे – सर्वोच्च न्यायालय आणि शासनानाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे (bullock cart race) मोठा दिमाखत आयोजन केले जात. बैलगाडा शर्यत (Bailgada Sharyat) हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नाही तर राज्याची परंपरा आणि शर्यतीबद्दल सर्वसामान्यांना किती प्रेम आहे. हे देखील यातून दिसून येते. सध्या पुणे जिल्हयातील अनेक भागात जत्रा सुरु होणार असून, या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे (bullock cart race) आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे बैलगाडा (Bailgada Sharyat) प्रेमींचा मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

आणि याच पार्श्ववभूमीवर बैलगाडा शर्यतींच्या आयोजनात शिथिलता देण्याबाबत एक बैठक पार पडली असून, या महत्वाच्या बैठकीला पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी, लम्पी चर्मरोगाची संबंधित जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर बैलगाडा शर्यतींच्या आयोजनात शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, बैलगाडा शर्यती सुरू राहाव्यात ही शासनाची भूमिका असून त्यासाठी शासन खंबीरपणे आपली भूमिका बजावेल.

बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीसाठी बाजू मांडण्यासाठी नेमण्यात आलेल्या वरिष्ठ विधिज्ञांना आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्या वतीने देण्यात येईल.

मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैलगाडा शर्यतींच्या अनुषंगाने बैलगाडा मालक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्या वेळी विखे बोलत होते.

बैलगाडा शर्यत लढ्यासाठी पुण्यात बैठक !

दरम्यान, राज्यातील बैलगाडा शर्यतीवर सुरू राहण्याबाबत न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे.

त्यामुळे राज्य सरकार आणि बैलगाडा संघटना प्रतिनिधी यांची पुण्यातील विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आज (दि. 3) नोव्हेंबरला यावर मार्गदर्शन करणार आहे.

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या पुढाकाराने होणार्‍या बैठकीला भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, बैलगाडा संघटना प्रतिनिधी, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.