ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

महाराष्ट्र बँकेचे १८ हजार कोटींचे कर्ज राईट ऑफ

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र बँकेने १७ हजार ८०२ कोटी रुपये कर्ज राईट ऑफ केले. त्यात बड्या थकबाकीदारांचे दहा हजार १३० कोटी रुपये होते.

त्या दहा हजार १३० कोटींपैकी फक्त ९३० कोटी (९ टक्के) रुपयांची आजतागायत वसुली झाली आहे. बड्या थकबाकीदारांची नावे जाहीर करायला मात्र बँकेने नकार दिल्याची माहिती सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी दिली.

बड्या थकबाकीदारांची नावे गुलदस्त्यात

बँकांच्या कर्जाचे तांत्रिकदृष्ट्या राईट ऑफ करण्यावरून मध्यंतरी गदारोळ झाला होता. तांत्रिक राईट ऑफ केले म्हणजे कर्जमाफी नाही, तांत्रिकदृष्ट्या राईट ऑफ केलेल्या कर्जाची वसुली सुरूच राहते.

या पार्श्वभूमीवर बँकेचा भागधारक या नात्याने बँक ऑफ महाराष्ट्राच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी दर वर्षी शंभर कोटींवर थकीत कर्ज असलेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या राईट ऑफ केलेल्या कर्ज खात्यांची नावे मागितली होती. या प्रत्येक कर्जाची प्रत्येक वर्षात किती वसुली झाली? याची माहिती मागितली.

गोपनीयतेचे निकष वेगवेगळे कसे ?

बड्या कर्जदारांची नावे गोपनीयतेच्या नावाखाली दिली नाहीत. यात दोन प्रश्न उभे राहतात. एक म्हणजे, ही माहिती गोपनीय असेल, तर स्टेट बँकेने गेल्या वर्षी २२५ बड्या कर्जदारांची नावे कशी दिली?

तर इंडियन ओव्हसिझ बँकेने माहिती अधिकारात ६० बड्या कर्जदारांची नावे कशी दिली? बँकगणिक गोपनीयतेची व्याख्या आणि निकष वेगळे असतात का?

सामान्य कर्जदारांचे हप्ते थकले तर त्याच्या वसुलीसाठी त्याच्या नाव, गाव-पत्त्यासह मालमत्तेच्या लिलावाची नोटीस वर्तमानपत्रात देताना गोपनीयता कशी आड येत नाही.

 

You might also like
2 li