मुंबई : कोरोनाच्या (Corona) महामारीने देशात (country) आणि राज्यात (State) पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

कोरोना विषाणू (Corona Virus) आणि त्याच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएन्टचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात देखील मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) आढळत आहेत. देशात २ लाख ९ हजार कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

रविवारी राज्यात २२ हजार ४४४ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. तर ५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Death) झाला आहे. तसेच ३९ हजार १५ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.

Advertisement

राज्यातील दररोजच्या रुग्णसंख्येपेक्षा रविवारी कमी रुग्णसंख्या आढळून आली आहे. दररोज ४० हजार सापडणारी रुग्णसंख्या रविवारी २२ हजारांवर आली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या २ लाख २७ हजार ७११ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर रविवारी राज्यात ५ ओमिक्रॉन (Omicron) च्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ओमिक्रॉनचे सर्व रुग्ण रविवारी पुण्यात (Pune Omicron) आढळले आहेत.

राज्यातील ओमिक्रॉन (Omicron) रुग्णसंख्या ३१३० वर पोहोचली आहे. त्यातील १६७४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. रविवारी देशात २ लाख ९ हजार ९१८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

तसेच देशात रविवारी ९५९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे २४ तासात २ लाख ६२ हजार ६२८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

देशात सध्या १८ लाख ३१ हजार २६८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर १५.७७ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

Advertisement