मुंबई : येत्या काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन (Republic Day of India) येऊन ठेपला आहे. यातच धक्कादायक (Shocking) माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रावर (Maharashtra) दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेकडून (Central Investigation Agency) अलर्ट राहण्याचा आणि खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला (Drone Attack Alert) करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
महाराष्ट्रातील मुंबई आणि इत्तर प्रमुख शहरे (Cities in Maharashtra) दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे ही सर्व शहरे अलर्टवर (Alart) आहेत. नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना तपास यंत्रणांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
डार्क नेटचा (Dark Net) वापर करून दहशतवादी मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्या करणार असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या सायबर विभागाने (Cyber Department) अहवाल दिला आहे, की दहशतवादी प्रवृत्तीच्या व्यक्ती ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर चर्चा करत होते.
सरफेस इंटरनेटच्या तुलनेत डार्क नेट ९९% आहे. टोर ब्राउझर हा डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज ट्रेस करता येत नाही.
कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा (Proxy bouncing) वापर केला जातो. मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत अनेकदा अलर्ट दिले जातात.