पुणे – सरकारी पदांच्या भरतीसाठी (Maharashtra Government Jobs) खालील विभागा मध्ये सरकारी नोकरी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकार दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या विभागात सरकारी नोकरी (Government Jobs) निश्चितपणे जारी करते, आपण त्यांच्यासाठी अर्ज कसा करू शकतो ते जाणून घेऊया. नुकतीच महाराष्ट्र भरती (Government Jobs) अधिसूचना अपडेट करण्यात आली आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील आहेत आणि सरकारी नोकरी (Government Jobs) शोधत आहेत ते या महाराष्ट्र सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने जारी केलल्या भरती प्रक्रियेअंतर्गत, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता ही पदं भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 11 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या तारखेपूर्वीच अर्ज करावा. महाराष्ट्रभर ही भरती होणार आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी www.mahagenco.in या वेबसाईला भेट देऊन करिअर पर्याय निवडून Advt. No. 09/2022 या लिंकमधली जाहिरात वाचावी. 330 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची तारीख :

सध्या अर्ज करण्याची प्रक्रिया सध्य सुरु आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर 2022

पदांचा तपशील :

एकूण पदं 330 पदं आहेत.
कार्यकारी अभियंता 73 पदं आहेत.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता 154 पदं आहेत.

उपकार्यकारी अभियंता 103 पदं आहेत.

शैक्षणिक पात्रता काय असावी वाचा…

कार्यकारी अभियंता : इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. 9 वर्षांचा अनुभव असावा.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता : इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. त्यासोबत 7 वर्षांचा अनुभव असावा.

उपकार्यकारी अभियंता : इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. त्यासोबत 3 वर्षांचा अनुभव असावा