पुणे – दोन वर्षानंतर पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesri) कुस्तीचा थरार सुरु झाला असून, यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचं यजमानपद पुणे शहराला मिळालं आहे. करोना (corona) निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं या स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला असून, मागच्या वर्षी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात आयोजित केली होती. मात्र, यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’चा (Maharashtra Kesri) मान हा पुणेकरांना (Pune) मिळाला असून, कुस्तीचा हा आखाडा पुण्यात रंगणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र केसरीचा (Maharashtra Kesri) आखाडा कुणी भरवायचा यावरून आता कुस्तीगीर संघटनांमध्ये वादाचा फड रंगला आहे. पुण्यात (Pune) महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार,

असली तरी शरद पवार अध्यक्ष असलेली पण बरखास्त केलेली जुनी कुस्तीगीर परिषद आणि भाजप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेली नवीन कुस्तीगीर परिषद या दोन्ही गटांनी स्पर्धा भरवण्याचा पवित्रा घेतल्यानं वाद निर्माण झालाय.

महाराष्ट्र केसरीचा आखाडा कुणी भरवायचा यावरून कुस्तीगीर संघटनांमध्ये वाद रंगला होता. मात्र, आता मुंबई हायकोर्टाकडून कुस्तीगीर परिषदेचा आदेश रद्दबातल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेनं महाराष्ट्र कुस्ती परिषदेची कार्यकारणी बरखास्त केली होती. मात्र, आता शरद पवार अध्यक्ष राहिलेल्या बरखास्त महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं रामदास तडस गटाला दिला मोठा दणका दिला आहे.

बाळासाहेब लांडगे यांनाचा सरचिटणीस म्हणून पूर्ण अधिकार असतील . रामदास तडस गटाला कोणतेही अधिकार नसतील, असं कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने रामदास तडस गटाला मोठा दणका दिला आहे.

भारतीय कुस्ती महासंघानं घेतलेली निवडणूक आणि निवडलेली समिती ही चुकीची असल्याने निवडणूक रद्द ठरवण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पुणेकरांना या वर्षाच्या अखेरीस कोथरूडमध्ये अनुभवायला मिळणार आहे. 900 कुस्तीगीर यांच्या सहभागात डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

यामध्ये 33 जिल्ह्यातील 11 महापालिकांमध्ये 45 तालीम संघातील 900 मल्ल स्पर्धेत होणार सहभागी होणार आहेत. नामांकित 40 मल्ल सुद्धा घेणार या स्पर्धेत भाग घेणार आहेत.

स्पर्धेचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान करणार असून डिसेंबर महिन्यात सहा दिवस ही स्पर्धा होणार आहे. यंदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा मान पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे.