पुणे – दोन वर्षानंतर पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesri) कुस्तीचा थरार सुरु झाला असून, यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचं यजमानपद पुणे शहराला मिळालं आहे. करोना (corona) निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं या स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला असून, मागच्या वर्षी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात आयोजित केली होती. मात्र, यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’चा (Maharashtra Kesri) मान हा पुणेकरांना (Pune) मिळाला असून, कुस्तीचा हा आखाडा पुण्यात रंगणार आहे.

महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri) स्पर्धेचा थरार पुणेकरांना या वर्षाच्या अखेरीस कोथरूडमध्ये अनुभवायला मिळणार आहे. 900 कुस्तीगीर यांच्या सहभागात डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी दिली आहे.

33 जिल्ह्यातील 11 महापालिकांमध्ये 45 तालीम संघातील 900 मल्ल स्पर्धेत होणार सहभागी होणार आहेत. नामांकित 40 मल्ल सुद्धा घेणार या स्पर्धेत भाग घेणार आहेत.

स्पर्धेचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान करणार असून डिसेंबर महिन्यात सहा दिवस ही स्पर्धा होणार आहे. यंदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा मान पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र केसरीचा आखाडा कुणी भरवायचा यावरून आता कुस्तीगीर संघटनांमध्ये वादाचा फड रंगला आहे. पुण्यात (Pune) महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार,

असली तरी शरद पवार अध्यक्ष असलेली पण बरखास्त केलेली जुनी कुस्तीगीर परिषद आणि भाजप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेली नवीन कुस्तीगीर परिषद या दोन्ही गटांनी स्पर्धा भरवण्याचा पवित्रा घेतल्यानं वाद निर्माण झालाय.

नव्या कुस्तीगीर परिषदेनं 14 ते 30 डिसेंबर दरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलंय. तर दुसरीकडे शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेल्या गटानं ही स्पर्धा भरवण्याचा अधिकार आपल्यालाच असल्याचा दावा केलाय.

पवार आणि लांडगे यांच्या नेतृत्वाखालील कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला न्यायालयानं स्थगिती दिलीय. त्यामुळे ही स्पर्धा भरवण्याचा अधिकार आपल्यालाच आहे असा दावा बाळासाहेब लांडगे यांनी केलाय.

महाराष्ट्र केसरी कुस्तीची चांदीची गदा :

कुस्ती पूर्वी पुण्यातील अशोक मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांच्या घरी महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या चमचणाऱ्या गदेचे (Gada) पूजन करण्यात येते.

दरवर्षी मोहोळ कुटुंबाकडून मानाची केसरीची गदा (Gada) दिली जाते. कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1986 पासून मोहोळ कुटुंबियांच्यावतीने ही गदा देण्यात येती.