पुणे – महाराष्ट्र पोलिसांच्या (Mharashtra Police) पहिल्या महिला चालक भरती (woman driver) बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच पार पडलेल्या महिला चालक (woman driver) भरती प्रक्रियेतून सर्व महिला बाद झाल्या आहेत. महिलांच्या जागांवर (woman driver) पुरूषांची भर्ती झाल्याने महिला उमेदवारांचे आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. आणि याच पार्श्वभूमीवर सर्व महिला पोलीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटणार घेणार असल्याचं बोललं जात आहे.

आमचं म्हणणे हेच आहे जे इतर पोलीस शिपायाला नियम आहेत ते आम्हालाही लागू राहावे, हीच आमची इच्छा आहे. खरेतर 15 वर्षानंतर ही भरती (Mharashtra Police) निघाली.

महिलांच्या जागी (woman driver) पुरूषांच्या जागा भरल्या गेल्या. तीन वेळा आम्ही मुख्यमंत्री यांना पत्र दिलेले आहे, अशी माहिती महिला उमेदवार देताना दिसत आहे.

2019 ची भरती करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. सर्व अटी शर्थी आम्ही पास झालो. रिझल्टची वेळ आली. तेव्हा मात्र आम्हाला 50 टक्के क्रायटेरियानुसार बाहेर काढले. शारिरिक चाचणीत 50 टक्के गुणांची अट जाहिरातीत नव्हती, तसे कुठेही म्हटले नव्हते. असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.

पोलिस भरतीला दिली स्थगिती…

दरम्यान, करोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आता निराशा पाहायला मिळत आहे.

असं असताना अलीकडेच सरकारने नोव्हेंबरपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर सरकारने लगेच यू-टर्न घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे.

प्रशासकीय कारणास्तव ही भरती पुढे ढकलल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याला आता स्थगिती दिली असून नवीन वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर केले जाईल, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.