मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. ‘गुरुवारी विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करा’, असे आदेश राज्यपालांनी ठाकरे सरकारला दिले आहेत.

त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं असून, शिवसेनेकडून सुद्धा हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली असून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली.

सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आहे. संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

दुपारी तीन पर्यंत आम्ही सर्व कागदपत्रं रेकॉर्डवर ठेवू अशी माहिती सुनील प्रभू यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली.

यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं तातडीनं याप्रकरणी सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

अभिषेक मनु सिंघवी यांनी अशा प्रकारे तातडीनं बहुमत चाचणी बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. यानंतर दोन्ही न्यायाधीशांनी आपापसात चर्चा केली.

कोर्टानं (Supreme Court) म्हटलं की याविषयीची आम्हाला कागदपत्रं द्यावीत. त्यावर आम्ही आज तीन वाजेपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करु, असं सिंघवी यांनी म्हटलं.

तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (shard pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानी अर्थात सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

मात्र. या बैठकीला शिवसेना (shivsena) नेते अनुपस्थित असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.