पुणे – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. दिवाळी (Diwali) हा दिपोत्सावाचा सण, “ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी उजेड देणे’ हाच संदेश या सणाचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना (Corona) महामारीच्या साथीमुळे सर्वांनाच दिवाळीचा सण निर्बंधांमध्ये साजरा करावाला लागला होता. मात्र, यंदाच्या वर्षी करोनाचा (Corona) आलेख पूर्ण पणे खाली आला असून, मोठ्या आनंदात दिवाळीचा (Diwali) सण साजरा नागरिकांडी साजरा केला आहे.

दरम्यान, दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागवली आहे. तसेच, नवीन वस्तू खरेदी करण्याकडे देखील चांगलाच भर दिल्याचे दिसून आले आहे.

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर, आयटी हब अशी पुण्याची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. आणि याच पुणेकरांनी दिवाळीचा मुहूर्त साधत तब्बल १७ हजार ३२५ वाहनांची (Bike And Car) खरेदी केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागातर्फे शुक्रवारी देण्यात आली.

यात सर्वाधिक दुचाकींची खरेदी झाली असून पुण्यात ११ हजार १४३ दुचाकी वाढल्या आहेत. तसेच, चारचाकी वाहनांचीही जोरदार खरेदी झाली असून तब्बल चार हजार २४९ चारचाकी पुण्यात वाढल्या आहेत.

यंदा इलेक्ट्रिक वाहनांचीही चांगलीच खरेदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत करोनाचे सावट होते. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली होती. मात्र, या दरम्यानच्या काळातही वाहन खरेदी समाधानकारक झाली.

यंदा मात्र करोनाचे सावट नसल्याने उद्योग आणि कामकाज पूर्ववत सुरू झाल्याने पुणेकरांची आर्थिक स्थिती पूर्ववत झाली असून पुणेकरांनी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक खरेदी यंदाच्या पाडव्याच्या मुहूर्तावर केली आहे.

६ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत पुणेकरांनी १७ हजार ३३५ वाहनांची खरेदी केल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

पुणेकरांची वर्षनिहाय पाडव्याची वाहन खरेदी वर्ष वाहन संख्या २०२२ १७ हजार ३२५ २०२१ १२ हजार ४२२ २०२० १५ हजार ६४४ २०१९ १५ हजार ५६६ इतकी आहे.