Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

Maharashtra Rain LIVE Updates : 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त, 436 मृत्यू !

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठवाड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जवळपास 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. (Maharashtra Rain LIVE Updates)

अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचं नुकसान झालं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरं वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

Advertisement

तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यासह एकूण 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत”, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Leave a comment