Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

Maharashtra rain news : राज्यावर चक्रीवादळाचे संकट अवघ्या 48 तासात झाले इतके मृत्यू !

गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात सोमवारी रात्री कहर माजवला. गेल्या 48 तासात मुसळधार पावसामुळे मराठवाडा विभागात 10 जणांनी जीव गमावला आहे. (Maharashtra rain news: Cyclone crisis in the state )

बीड जिल्ह्यात 3, उस्मानाबाद आणि परभणीत 2, जालना,नांदेड आणि लातूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, मराठवाड्यासाठी पुढील 24 तास महत्वाचे आहेत.

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. तर, मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Advertisement

मराठवाड्यात गेल्या 48 तासात 10 जणांनी जीव गमावला आहे. याशिवाय 200 जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.

मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात ठिकठिकाणी घरांचं नुकसान झालं आहे.

औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड जालना आणि हिंगोलीमध्ये पावसामुळं शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Advertisement

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं संपूर्ण मराठवाड्याला फटका बसला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी पूर आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळं शेतीचं नुकसान झालं आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळं औरंगाबाद शहरालाही फटका बसला.

औरंगाबादमध्ये सोमवारी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले.

Advertisement
Leave a comment