file photo

महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, कोकण , मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे.

Advertisement

मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली.

मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल.

Advertisement

गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे.

हा आकडा 30 लाख हेक्टरपर्यंत जाऊ शकतो.

महसूल प्रशासनाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालात सुमारे 2254 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Advertisement

तसेच याचा अंतिम अहवाल 3000 कोटी रुपयांचा असू शकतो.

पहिल्या टप्प्यातील अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी गुरुवारी दिली होती.

मराठवाड्यात कालपासून पुन्हा पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी जलमय स्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

औरंगाबादमध्ये रात्री मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे.

विजांच्या कडकडाटासह अनेक भागांत ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.

शहरातील काही भागात आणि शहराजवळील नारेगाव पळशी भागातही पाणी साचले आहे.

Advertisement

ओढे ओसंडून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी दुकानात पाणी शिरले आहे.

सोयगाव सिल्लोड खुलताबाद फुलंब्री औरंगाबाद तालुक्यात या पावसाचा फटका बसला आहे.

नांदर येथील वीरभद्रा नदीला रात्री झालेल्या जबरदस्त पावसामुळे पूर आला आहे.

Advertisement

गावात येण्यासाठी असलेले दोन्ही पूल पाण्याखाली गेले. पुरामुळे गावात वेशीपर्यंत पाणी आले होते.

सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी अजूनही पूरस्थिती कायम आहे.

Advertisement