लाब चक्रीवादळाच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढील ४८ तास कायम राहणार असल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather)

मुंबई आणि ठाण्यात अतिवृष्टीचा अंदाज असून विदर्भ, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून मंगळवारी सांगण्यात आले आहे.

काल रात्रीपासूनच मुंबई व उपनगरात पावसाची संततधार कायम आहे. आज पहाटेही मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. येत्या ३ ते ४ तासांत वेगवान वाऱ्यासह पाऊस बरसेल, अशा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Advertisement

त्याचबरोबर, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, नंदूरबार या जिल्ह्यांसाठीही पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे ठरणार आहेत.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, अहमगनगर, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसंच, याकाळात वाऱ्यांचा वेगही अधिक राहिल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. त्यामुळं शक्यतो नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement

गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार आहे. नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये.

आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.

Advertisement