पणजी : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackery) या दोन्ही नेत्यांनी मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर एकाच गाडीने प्रवास केला. यावर संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी भाष्य केले आहे. तसेच भाजपला (BJP) इशाराही दिला आहे.

मुंबईतील विकास कामांची पाहणी करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीने (Car) प्रवेश केला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपला इशारा दिला आहे.

संजय राऊत म्हणाले, दोन्ही नेते एकत्र विकास कामांची पाहणी करत आहेत. एकत्र सोबत जात आहेत ही उत्तम गोष्ट आहे. पण त्यामुळे भाजपच्या पोटात कळ येत आहे.

Advertisement

दाब दबावाचे राजकारण करून, धमक्या देऊनही महाविकास आघाडीला तडा जात नाही ही भाजपची पोटदुखी आहे, या सरकारचे स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती आहे आणि राहील असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राला झुकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला (Maharashtra) वाकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पण महाराष्ट्राचा इतिहास लढण्याचा आहे. तुमच्या छाताडावर पाय देऊन उभे राहू. महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.

Advertisement