देशातील कोणत्या मुख्यमंत्र्याची कामगिरी चांगली, कोणत्या मुख्यमंत्र्यांची वाईट याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे.

ठाकरे यांना सर्वाधिक मते

लोकप्रिय मुख्यमंत्री कोण यावर उत्तर देताना सर्वाधिक मते ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत.

सर्व्हेमध्ये जवळपास 49 टक्के मतदारांनी ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचं आणि त्यांना पुन्हा मत करू असं म्हटलं आहे.

Advertisement

ठाकरे यांच्याखालोखाल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना 44 टक्के मते मिळाली आहेत, तर तिसऱ्या स्थानी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आहेत.

अमरिंदर सिंग सर्वांत अप्रिय मुख्यमंत्री

सर्व्हेनुसार, लोकप्रिय नसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पहिल्या क्रमांकावर आहेत.

60 टक्के मतदारांनी त्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नकोत असं म्हटलं आहे.

Advertisement

तर 15 टक्के लोकांनी त्यांच्या कामगिरीबाबत समाधन व्यक्त केलं; पण पुन्हा मत देण्यास इच्छूक नसल्याचं म्हटलं आहे.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात नकारात्मक मते जास्त

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांबाबत सर्वाधिक नकारात्मक उत्तर मतदारांनी दिलं आहे. नुकतंच तिथं नव्या मुख्यमंत्र्यांकडे राज्याची सूत्रे सोपवली असली, तरी तिथल्या आधीच्या नेतृत्वाबाबत 80 मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांची कामगिरी खराब असून पुन्हा मुख्यमंत्री नकोत असं मत दिलं आहे. उत्तराखंड आणि पंजाबनंतर यादीत गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये विजय रुपानी मुख्यमंत्री आहेत.

Advertisement

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे पाचव्या स्थानी आहेत. उत्तराखंड, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पुढच्यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

 

Advertisement