Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

महाविकास आघाडी सरकार सगळ्याच परीक्षांत नापास झाले !

राज्‍यातील मंदिरे उघडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला घटस्थापनेचा मुहूर्त सापडला असला, तरी केवळ भाजपच्या मागणीला विरोध म्‍हणून इतके दिवस मुख्यमंत्र्यांनी हा विषय व्‍यक्तिगत प्रतिष्‍ठेचा केला होता का, असा सवाल भाजपचे ज्येष्‍ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात झालेल्या गोंधळावर भाष्य करताना आ.विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा सावळागोंधळ रोजच सुरू आहे. परिणाम विद्यार्थ्यांना त्याचे भोगावे लागत आहेत. महाविकास आघाडी सरकार सगळ्याच परीक्षांत नापास झाले आहे.

सरकारच्या अनिश्चिततेचा परिणाम जनतेला भोगावा लागत असल्याची टीकाही आ.विखे पाटील यांनी या वेळी केली.माध्यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की, इतर राज्यांमध्ये नियमावली करून मंदिरे केंव्हाच उघडण्यात आली.

Advertisement

तिरुपती देवस्थान, वैष्णाेदेवी यांसारखी मोठी देवस्थानेही कोविड नियमांचे पालन करून भाविकांसाठी उघडण्यात आली. आपल्या राज्यात मात्र मंदिरे उघडण्यात महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक उशीर केला. केवळ भाजपची मागणी होती म्हणून हा प्रश्न सरकारने व्यक्तिगत केला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

राज्यात एकीकडे मॉल सुरू झाले, बिअर बार सुरू होते, एसटी बसेस‍ही सुरू झाल्या. मग फक्त भाविक मंदिरात गेल्यानंतरच कोरोना होणार होता का? हा नकारात्मक दृष्टिकाेन घेऊन मुख्यमंत्री काम करणार असतील तर राज्याचा विकास करण्याच्या या केवळ गप्पा ठरल्या आहेत, जनतेचा त्यांच्यावर भरवसा राहिलेला नसल्याचा अाराेपही त्यांनी यावेळी केला.

Advertisement
Leave a comment