पुणे – वीजचोरी (Electricity) करणाऱ्या वीज (Electricity) ग्राहकांच्या विरोधात (Crime) महावितरण (Mahavitaran News) आक्रमक झाली असून येणाऱ्या काळात अश्या नागरिकांवर कडक कारवाई होणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या एका आठवड्यात कोकण, पुणे (Pune), औरंगाबाद व नागपूर परिक्षेत्रातील विविध ठिकाणी घालण्यात आलेल्या धाडीमध्ये 198 वीजचोरांना दणका देत अंदाजित 2 कोटी 50 लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात यश मिळवले आहे. कमी वीजबिल (Electricity) येण्यासाठी अनेक नागरिक मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करत असल्याचं यातून दिसून आलं आहे.

त्यामुळे महावितरण (Mahavitaran News) सक्रिय झालं असून, आठवडाभरात ‘महावितरण’ने पुणे, औरंगाबाद, नागपूर व कोकण परिक्षेत्रात विविध ठिकाणी धाडसत्र राबवून 198 वीजचोरांना दणका देऊन अडीच कोटी रुपयांची वीजचोरी पकडली आहे.

मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करूनही वीज ग्राहकास कमी रकमेचे देयक कसे जाते, अशा ग्राहकांविरूध्द कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे (Mahavitaran News) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते.

मोठ्या प्रमाणात विजेचा (Electricity) वापर करून येणाऱ्या मोठ्या रकमेचे देयक टाळण्यासाठी वीजचोरांनी त्यांच्याकडे असलेल्या मीटरमध्ये फेरफार केली,

असावी असा संशय आल्याने महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने मीटरची तपासणी करण्यासाठी विविध पथके तयार केली.

या पथकांनी नागपूर, औरंगाबाद, पुणे व कोंकण परिक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून जास्त वीज वापर असलेल्या मात्र कमी वीजबिल येणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.

त्यामध्ये जास्त वीजवापर असलेल्या परंतु कमी वीजबिल येणाऱ्या सर्वच ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. या वीजचोरीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असून, वीजचोरी करणाऱ्यांवर येणाऱ्या काळात कठोर कारवाईची मोहीम सुरुच राहणार असल्याचा इशारा ‘महावितरण’ने दिला आहे.

दरम्यान, एकट्या कोंकण परिक्षेत्रातील वीजचोरीचे मुल्याकंन करण्यात आले असून येथील वीजग्राहकांनी एकूण 7 लाख 44 हजार 114 युनिटचा अनधिकृतपणे वापर केल्याचे निदर्शनास आले आहे.