मुंबई : महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आता ‘अथर्व: द ओरिजिन'(Atharva-The Origin) वेब सीरिज (Web Series) मध्ये राक्षसांसोबत लढताना दिसणार आहे. ही वेब सीरिज एका ग्राफिक कादंबरीवर आधारित आहे.

या वेब सिरीजचा टीझर (Teaser) सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालत आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा सुपरहिरो अवतार पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत.

याचे लेखन थमिलमणी यांनी केलं आहे, तर आदिकलराज आणि अशोक मनोज यांनी निर्मिती केली आहे. एका यूझरनं म्हटलंय, की हे सर्व पाहणं रोमांचक आहे.

Advertisement

यातले ग्राफिक्सही लेटेस्ट आहेत. नवीन युगातली ग्राफिक कादंबरी आहे. या टीमला त्यांच्या अप्रतिम प्रयत्नासाठी मनःपूर्वक शुभेच्छा… यासह अनेकांनी सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.

‘अथर्व: द ओरिजिन’ (Atharva-The Origin) चा फर्स्ट लूक जारी करून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीत होतात असून यावर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.

एका यूझरनं म्हटलंय, की हे सर्व पाहणं रोमांचक आहे. यातले ग्राफिक्सही लेटेस्ट आहेत. नवीन युगातली ग्राफिक कादंबरी आहे. या टीमला त्यांच्या अप्रतिम प्रयत्नासाठी मनःपूर्वक शुभेच्छा… यासह अनेकांनी सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.

Advertisement

या ग्राफिक नॉव्हेलची घोषणा 2020मध्ये झाली होती. याची घोषणा खुद्द धोनीची पत्नी साक्षीनं केली होती. फर्स्ट लूकमध्ये धोनी युद्धभूमीवर अॅनिमेटेड अवतारात दिसत आहे. यामध्ये तो राक्षसांचा वध करताना दिसत आहे. लोकांना धोनीचा लूक प्रचंड आवडलाय.