पुणे : शहरातील  हाय स्ट्रीट (High street) जवळील पाठशाळा (School) परिसरातून एका ४ वर्षाच्या मुलाचे (4 year old boy) अपहरण (Abduction) करण्यात आले आहे. तेव्हापासून त्या मुलाचा शोध सुरु आहे. यासाठी आता भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) सरसावले आहेत.

स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. स्वर्णव ला घरी दुग्गू नावाने ओळखले जायचे. ११ जानेवारी रोजी अपहरण केल्याची घटना घडली आहे. तेव्हापासून त्याचा शोध सुरु आहे.

भाजपचे (BJP MLA) आमदार महेश लांडगे यांनी अपहरणकर्त्याचे फोटो (Photo) सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करत काही माहिती मिळाल्यास ती शेअर करण्याची विनंती केली आहे. महेश लांडगे यांनी एक पोस्टर प्रकाशित केला आहे.

Advertisement

या पोस्टरमध्ये गाडी चालवणाऱ्या अपहरणकर्त्याचे (kidnapper) २ फोटो प्रकाशित करण्यात आले आहेत. अपहरणकर्त्याबरोबर अपहरण झालेला मुलगा त्याच्या गाडीवर दिसत आहे.

हा अपहरण करणारा कुठे दिसून आल्यास संपर्क करण्याचे आव्हान महेश लांडगे यांच्याकडून करण्यात आले आहे. काळ्या रंगाच्या अ‌ॅक्टिव्हा क्रमांक ८५३१ या गाडीवरून मुलाचे अपहरण करण्यात आले आहे.

या अगोदरही मुलाचे वडिल सतिश चव्हाण यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट (Facebook post) करण्यात आली होती. माहिती मिळाल्यास संपर्क करण्यात यावा अशी विनंती देखील करण्यात आली होती.

Advertisement

या पोस्ट मध्ये मुलाचे फोटो आणि माहिती देण्यात आली होती. कुठे आढळुन आल्यास त्वरित संपर्क करावा असेदेखील पोस्ट मध्ये लिहण्यात आले होते. अजूनही मुलगा आढळून आला नसल्याने महेश लांडगे पुढे सरसावले आहेत.